धक्कादायक! पत्नी माहेरी गेल्यानंतर पतीने घरात गळफास लावून केली आत्महत्या;

अकोला/प्रतिनिधी: पत्नीच्या वियोगाने मानसिक तणावात गेलेल्या एका पित्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील बिहाड माथा गावात उघडकीस आली आहे. युवकाला दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद; पत्नी गेली माहेरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती कारणांवरून सतत वाद होत होते. या वादांना कंटाळून पत्नी गेल्या सहा-सात दिवसांपासून माहेरी राहायला गेली होती. त्यामुळे युवक मानसिक तणावात होता. आणि सतत मद्यप्राशन करत असल्याचे सांगण्यात आले.
रागाच्या भरात गळफास घेतला
रात्री युवकाने राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्या सकाळी ही घटना उघडकीस आली. गावात मोठी खळबळ उडाली असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
पोलिसांचा तपास सुरू, आकस्मिक मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.