सांगोला

शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग; काळीमा फासणारी घटना


अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, पीडितेच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल 

मंगळवेढा/प्रतिनिधी: तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुढे आली आहे. बोराळे शाळेतील एका शिक्षकाने एका अल्पवयीन (१७ वर्षीय) विद्यार्थीनीला घरी बोलावून घेवुन घराचा दरवाजा बंद करून जवळ ओढून अंगावरून हात फिरवून  तिच्याशी अश्लिल कृत करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलिसांनी शिक्षकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वय ५६ रा. बोराळे ता. मंगळवेढा जि. सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत आरोपी शिक्षक आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अल्पवयीन विद्यार्थीनीला इयत्ता पाचवी ते सातवी पर्यत हिंदी व मराठी या विषयाला शिक्षक होते.

अल्पवयीन विद्यार्थी इयत्ता पाचवी व सहावी या वर्गात शिकत असताना हिंदी व मराठीच्या तासाचा  वेळी शिक्षक नेहमी विद्यार्थिनीच्या जवळ येवून विद्यार्थिनीच्या अंगाला हाताने स्पर्श करुन बोलत असायचे.

परंतु विद्यार्थिनीने याबाबत काही समजत नसल्याने याबाबत घरात कोणाला काही सांगितले नव्हते. त्यानंतर इयत्ता सातवी व इयत्ता आठवी या वर्गावर त्यांचा कोणताही तास नसताना ते विद्यार्थिनीशी बोलण्याचा व जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे.

 त्यानंतर विद्यार्थिनी इयत्ता नववीमध्ये असताना शिक्षक तिचा वर्गावर कोणत्याही विषयाला शिकवत नव्हते. तरीही ते ऑफ तासाचे वेळी येवून विद्यार्थिनीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे.

विद्यार्थिनीला तू माझ्या घरी ये, आमच्या घरी कोण नसते, आपणाला बोलता येईल, असे बोलायचे तसेच विद्यार्थिनीला वॉटसअपद्वावारे वारंवार मेसेज करून फोटो पाठविण्यास सांगायचे.

विद्यार्थिनीला फोन करून तु माझे घरी ये, घरी आलीस तर तुला मी दहावीच्या पेपरला मदत करतो. त्यामुळे तुला जास्त मार्क पडतील 

व तुझा बोर्डात नंबर येईल तुझे नाव होईल. असे म्हणुन त्यांनी विद्यार्थिनीला प्रोसाहन करायचे अल्पवयीन मुलीकडे दोन वेळा शरिरसंबंधाची मागणी केली होती.

दि.17 मार्च 2025 रोजी विद्यार्थिनीचा शेवटचा भुगोलचा पेपर दुपारी 2 वाजता संपला पेपर संपल्यावर विद्यार्थिनीचा वडिलांना फोन करून पेपर कसा गेला विचारले.

असे विचारुन त्यांनी घरी तु कधी येते अस विचारले असता विद्यार्थिनीने घरी येण्यास नकार देवून फोन कट केला.

 त्यानंतरही आरोपी शिक्षकाने वारंवार फोन करुन घरी ये नाहीतर मी तुला दहावीच्या पेपरमध्ये नापास करीन, तुझी लहान बहिणी आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत अशी धमकी देत होते.

आरोपी शिक्षकाचा धमकीला घाबरुन विद्यार्थिनी शिशाकाचा घरी सायं 4 च्या सुमारास गेली त्यावेळी  आरोपी शिक्षक एकटेच घरी होते. 

त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद केला व विद्यार्थिनीला जवळ ओढून अंगावरून हात फिरवून अश्लिल कृत करू लागले. तेव्हा विद्यार्थिनी मोठ मोठ्याने ओरडू लागल्याने शिक्षकाने विद्यार्थिनी सोडले. त्यानंतर विद्यार्थिनीने  आरोपी शिक्षकाचा नंबर ब्लॉक केला होता. तरीही त्यांनी विद्यार्थिनीला दि.16 एप्रिल 2025 रोजी साधा मेसेज करून त्रास देत असल्याचे दिलेल्या विद्यार्थिनीने म्हटले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button