महाराष्ट्र

पोटगीच्या वादातून जावयाने केला सासऱ्याचा खून, सासू-मेव्हणा गंभीर जखमी


सोलापूर / प्रतिनिधी :  मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात कौटुंबिक वादाचा भीषण परिणाम समोर आला असून, पोटगीच्या वादातून संतप्त झालेल्या जावयाने आपल्या सासरच्यांवर चाकूने सपासप हल्ला केला. यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, सासू आणि मेव्हणा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोटगीच्या वादातून भडकला जावई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीशी गेल्या अडीच वर्षांपासून वाद सुरू होता. पत्नी माहेरी परत गेल्यापासून ती पुन्हा सासरी आली नव्हती. त्यातच तिने न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. त्यामुळे जावई अधिकच संतप्त झाला.

सासरी जाऊन थेट हल्ला; पोलिसांना चुकीचा कॉल

रात्री जावई आपल्या सासरी पोहचला आणि तिथे सासू, सासरे आणि मेव्हण्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला. सासू आणि मेव्हणा गंभीर जखमी असून त्यांच्यावर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे हल्ल्यानंतर आरोपी जावयाने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना “माझ्यावर हल्ला झाला” अशी खोटी माहिती दिली. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना वास्तविकता कळताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

लग्नाच्या 10 दिवस आधी घरात शोककळा

या घटनेने कुटुंबीयांवर दुहेरी आघात केला आहे. कारण मेव्हण्याचे 6 मे रोजी लग्न ठरले होते. पण त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्याने घरात सणाऐवजी शोककळा पसरली आहे.

गुन्हा दाखल, आरोपी अटकेत

मोहोळ पोलिसांनी जावयाचा विरोधात खून व खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंदवले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास मोहोळ पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button