देश- विदेशसांगोला

सांगोला येथे परशुराम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सांगोला/प्रतिनिधी : आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता महादेव गल्लीतील दत्त मंदिर येथे भगवान परशुराम यांच्या पादुकांचे अभिषेक करण्यात येणार आहे.

यानंतर सायंकाळी ५.३० वाजता भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमात भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, स्पर्धेनंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व कार्यक्रमांना परशुराम युवक संघटना यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button