सांगोला येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहर व तालुक्यात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने समस्त वीरशैव लिंगायत समाज आणि महात्मा बसवेश्वर युवक संघटनेच्यावतीने २७ एप्रिल ते १ मे दरम्यान खंडोबा मंदिर व मारुती मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदेश पलसे यांनी दिली.
कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे :
- २७ एप्रिल :
सकाळी १० वाजता चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा (इ. १ली ते ४थी आणि ५वी ते १०वी गटांसाठी)
सायंकाळी ६ वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा - २८ एप्रिल :
सायंकाळी ६ वाजता महिला व मुलींसाठी फनी गेम्स - २९ एप्रिल :
सायंकाळी ७.३० वाजता कु. सृष्टी सुनील लिगाडे यांचे विशेष व्याख्यान - ३० एप्रिल :
सकाळी ८ वाजता मोटरसायकल रॅली, त्यानंतर १० वाजता पुष्पवृष्टी
दुपारी ४ वाजता वीरशैव महिला भजनी मंडळाचे भजन कार्यक्रम
सकाळी ११ वाजता सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण - १ मे :
दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी स्पर्धकांना रोख बक्षिसांची सोय करण्यात आली आहे. महात्मा बसवेश्वर युवक संघटना व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी मो. ९७६४६४२१२२, ९५६१५३७९७२ ९६६५४३५८३१, ९७६४०३१९३२, ९१७२३७१०४४, ९५०३४९२२८८ यांच्याशी संपर्क साधावा.