Pahalgam Terror Attack : सांगोला तालुक्यातील जम्मू काश्मीरला गेलेले पर्यटन सुखरूप

सांगोला/प्रतिनिधी: शहरातील तीनही कुटुंबे व तालुक्यातील बुद्देहाळ येथील चौघेजण जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते ते सर्वजण सुखरूप आहेत. सांगोला शहरातील तिन्ही कुटुंब आज रात्री झेलम एक्स्प्रेसने परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.
सांगोला कोष्टी गल्ली व विद्यानगर, इचलकरंजी येथील असे तीन कुटुंब ११ एप्रिल रोजी दौंड मधून झेलम एक्सप्रेसने तीन दिवस प्रवास करत जम्मूला पोहोचले. तिथून वैष्णवी देवी कटरा येथे गेले त्यानंतर १४ एप्रिल रोजी काश्मीर, श्रीनगर, पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग पेड की गिली, चिकोटी, दूध पत्री निसर्ग रम्य ठिकाणे पाहून श्रीनगर मधील चार गार्डनसह अवंतीपुरा पर्यटन केले.
जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या सांगोल्यातील तिन्ही कुटुंबांशी सांगोला तहसील कार्यालयाकडून संपर्क झाला असून सर्वजण सुखरूप आहेत. श्रीनगरकडून जम्मू येथून झेलम- पुणे एक्स्प्रेसने सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले.
३० कि.मी. अंतरावर असल्यामुळे आम्ही सुखरूप होतो आम्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली मात्र सुदैवाने हल्ल्याचे ठिकाण आमच्यापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर असल्यामुळे आम्ही सुखरूप आहोत अशी माहिती पर्यटकानी दिली.