देश- विदेश

अमेरिका, चीन मागे.. ‘सोने का खजाना’ भारतातच लपलेला!


दिल्ली /  प्रतिनिधी: जगात सर्वाधिक सोना कुठे आहे? अमेरिका, चीन, जर्मनीसारख्या बलाढ्य देशांची नावं सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात. पण वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या नव्या अहवालानुसार, खरं सोन्याचं साम्राज्य भारतातच लपलेलं आहे – तेही जनतेच्या घरी!

इतिहासभर चमकत आलेलं सोने आजही अनमोल

राजा-महाराजांच्या काळात संपत्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक असलेलं सोने, आजच्या घडीला देखील आर्थिक अस्थिरतेच्या काळात ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून ओळखलं जातं. आभूषण असो वा गुंतवणूक – सोन्याची मागणी आजही तितकीच तेजस्वी आहे.

सरकारी भांडारात अमेरिका आघाडीवर… पण खाजगीदृष्टीने भारत राजा‘!

फाइनेंशियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार डिसेंबर 2024 पर्यंत:

  • अमेरिकाकडे सर्वाधिक सरकारी साठा – 8,134 टन
  • जर्मनी, चीन, त्यानंतर भारत – भारताचा सरकारी साठा: 876 टन

पण खऱ्या आश्चर्याची गोष्ट ही की, सरकारी आकडे एकीकडे ठेवले तर भारतीय कुटुंबांकडे तब्बल 24,000 टन सोने आहे!
हा आकडा जगभरातील सर्व सेंट्रल बँकांच्या एकूण सोन्याच्या साठ्याइतका आहे! चीनची जनता दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्या जवळ सुमारे 20,000 टन सोने आहे.

सोन्यात गुंतवणूक करणे का योग्य?

सध्या भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,240 रुपयेच्या आसपास आहे आणि लवकरच ती 1 लाखाच्या टप्प्यावर जाऊ शकते.
तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $3,333 प्रति औंसच्या दराने ट्रेड होत असून, गेल्या वर्षभरात सुमारे 40% परतावा दिला आहे.विशेषज्ञांचे मत: गुंतवणूक पोर्टफोलिओमधील किमान 10% हिस्सा सोन्यात ठेवणे शहाणपणाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी एखादी अंगठी, हार किंवा सोन्याचा नाणं खरेदी करताना, ते फक्त दागिना किंवा भेटवस्तू न मानता, एक आर्थिक संरक्षण कवच समजा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button