Breaking News : सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांची सुसाईड नोट सापडली; महिलेचे नाव समोर!
कोण आहे ती महिला ?

सोलापूर/प्रतिनिधी : सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशीयन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आताच एक मोठी बातमी समोर येत आहे. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्या करण्यास एका महिलेने प्रवृत्त केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे ती महिला ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-मानेवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहलेली होती. त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचे यामध्ये नमूद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 च्या सुमारास गुन्हा नोंद केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी पोलिसांनी घेऊन आरोपी महिलेला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
काय आहे नेमकं प्रकरण :
डॉ. वळसंगकरांना आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती पाहिजे असायचे. त्यासाठी ते आग्रह करत होते. परंतु रुग्णांकडून उपचाराची रक्कम नोंद न करता घेतली जात होती. त्यांनी यावर आक्षेप नोंदवला होता. पण त्यांच कोणी ऐकत नव्हते. या महिलेला त्यांनी कामावरून देखील काढले होते. आणि या महिलेने आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली. तिच्या धमकीवरून पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, काही डॉक्टरांना ते मान्य केले नाही. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर प्रचंड तणावाखाली गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.