महाराष्ट्रदेश- विदेश

“तरच मंदिरात मिळणार दर्शन?” अष्टविनायकसह या पाच मंदिरांमध्ये नवा नियम लागू


पुणे / प्रतिनिधी: अष्टविनायक गणपतींच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरातील पाच प्रमुख मंदिरांनी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरुषांनी पारंपरिक पोशाखात, तर महिलांनी साडी किंवा सलवार कमीजसारखा सभ्य व पारंपरिक पोशाख परिधान करूनच मंदिरात प्रवेश करावा, अशी विनंती देवस्थान ट्रस्टने केली आहे.

      ही मंदिरं आहेत

  • श्री मोरेश्वर मंदिर, मोरगाव
  • श्री चिंतामणी मंदिर, थेऊर
  • श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक
  • मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर, चिंचवड
  • खार नारंगी मंदिर

या सर्व मंदिरांमध्ये मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी ही नियमावली आखण्यात आली आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने यासंदर्भात अधिकृत सूचना प्रसिद्ध केली असून, ड्रेसकोड सक्तीचा नसून ‘शिस्तबद्ध व आदरयुक्त’ पोशाख परिधान करण्याची विनंती केली आहे.

ड्रेसकोड काय सांगतो?
पुरुषांसाठी: शर्ट, टी-शर्ट, पँट, धोतर, कुर्ता-पायजमा
महिलांसाठी: साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा इतर पारंपरिक पोशाख

मंदिर प्रशासनाच्या मते, पारंपरिक पोशाख भक्तांमध्ये आदरभाव निर्माण करण्यास मदत करतो आणि मंदिराच्या वातावरणात पावित्र्य व शिस्त टिकवून ठेवतो. ट्रस्टने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अयोग्य, असभ्य पोशाखाने येणाऱ्यांना प्रवेश नाकारण्याचा अधिकार मंदिर प्रशासनाकडे असणार आहे.नियम तोडल्यास काय?


याचा उद्देश कोणालाही रोखणे नव्हे, तर मंदिरातील भक्तीमय वातावरण, सांस्कृतिक मूल्यं आणि परंपरेचा सन्मान राखणे आहे. त्यामुळेच, सर्व भक्तांना समजूतदारपणे या नियमांचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button