सांगोल्यात वनविभागाची तत्परता; अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल

सांगोला / विशेष प्रतिनिधी : सांगोला शहरातील इन पब्लिक न्यूज कार्यालयजवळ एक मोठा मांडूळ सापडला. परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र वनविभागाने तात्काळ कारवाई करत अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली आणि मांडूळ सुरक्षितरित्या पकडून वनक्षेत्रात सोडण्यात आले.
वनविभागाचे तुकाराम जाधवर (वनपरिक्षेत्र अधिकारी, सांगोला ), जी.बी. व्हरकटे (वनरक्षक,सांगोला ), जे.जे. खोंदे (वनपाल,सांगोला ) आणि सर्पमित्र अकबर बागवान सांगोला यांनी घटनास्थळी येऊन मांडूळ पकडले आणि अचकदानी येथील वनपरिक्षेत्रात सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यांच्या या तात्काळ प्रतिसादामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत कौतुकाचे केले.

मांडूळ हा विषारी नाही परंतु दंश घातक : तुकाराम जाधवर
वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगितले की, “मांडूळ प्राणी विषारी नसतो पण त्याचा दंश काही वेळा घातक ठरू शकतो. हा प्राणी जमिनीत भुसभुशीतपणा निर्माण करून कृषीक्षेत्राला उपयुक्त ठरतो. मात्र याबाबत अंधश्रद्धा पसरवली जाते, जी धोकादायक आहे. तस्करी करणे हा गुन्हा आहे. नागरिकांनी अशा प्राण्यांना बघितल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.”
मांडूळवर अंधश्रद्धा आणि तस्करी वाढतेय : सर्पमित्र अकबर बागवान
सर्पमित्र अकबर बागवान यांनी यावेळी सांगितले की, “मांडूळ विषारी नसतो तरीही त्याच्यावर अंधश्रद्धेच्या आधारावर तांत्रिक विधी करणे, त्याची तस्करी करणे अशा प्रकारांत त्याचा वापर होतो. त्यामुळे प्रजाती धोक्यात आली आहे. नागरिकांनी अंधश्रद्धांना बळी पडू नये अशा प्राणी आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

वनविभागाचे वेळेवरचे कामगिरीबद्दल कौतुक
इन पब्लिक न्यूज कार्यालयाजवळ आढळलेला मांडूळ आणि वनविभागाची जलद कारवाई केली. नागरिकांनी या संवेदनशील कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत वनविभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.