महाराष्ट्र

Swargate Rape Case : आरोपीच्या वकिलांचा दावा, संबंध संमतीने झाले

वकिलांच्या युक्तिवादामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे


पुणे/विशेष प्रतिनिधी : स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा दावा केला होता. या प्रकरणात अटक केलेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करत पीडितेच्या जबाबातील घटनाक्रमाचा आधार घेत संबंध संमतीने झाल्याचा युक्तिवाद केला. 

गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी गाडे याला अटक केली होती. मात्र, आता न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी असा मुद्दा उपस्थित केला की, पीडितेच्या जबाबानुसार घटनाक्रम पाहता जबरदस्तीने शारीरिक संबंध घडले नाहीत. त्यामुळे या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा होत नसून संबंध परस्पर संमतीने झाल्याचा दावा केला आहे. 

या वकिलांच्या युक्तिवादामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता न्यायालय या दाव्याचा कितपत स्वीकार करते आणि आरोपीला जामीन मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button