महाराष्ट्र

मोबाईल, लॅपटॉप उन्हाळ्यात गरम होतोय? हे उपाय नक्की करून बघा

लॅपटॉप, मोबाईल किंवा इतर गॅजेट्स एकमेकांच्या वर ठेवू नका


उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजण गरमीपासून बचाव करण्याचे उपाय शोधू लागतो. काही जण नवीन कूलर, एसी किंवा फ्रिज खरेदी करतात, तर काही जुन्या वस्तू दुरुस्त करून वापरतात. पण फक्त शरीराचाच नव्हे, तर तुमच्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचाही उन्हाळ्यात विशेष सांभाळ करावा लागतो. गरमीमुळे ही उपकरणे जास्त गरम होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा ते बंदही पडू शकतात.

तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसचे तापमान नियंत्रित ठेवायचे असेल, तर काही महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा.

उष्णतेपासून बचावाचे उपाय:

हवेशीर ठिकाणी ठेवा
लॅपटॉप, कम्प्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवा. भिंतीच्या अगदी जवळ किंवा बंद कपाटात ठेवू नका. तसेच प्रिंटर, राउटर आणि कम्प्युटरमधील व्हेंट्स स्वच्छ ठेवा, जेणेकरून उष्णता योग्यरित्या बाहेर पडू शकेल.

उन्हाळ्यात घटतंय दूध उत्पादन ? ‘हे’ करा आणि वाढवा

थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण द्या
खिडकीजवळ किंवा थेट उन्हात काम करताना लॅपटॉप आणि कम्प्युटरवर सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डिव्हाइस थंड आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा, तसेच शक्य असल्यास पंख्याखाली किंवा एसीच्या हवेत ठेवा.

डिव्हाइसेस एकमेकांवर ठेवू नका
उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त गरम होतात, त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल किंवा इतर गॅजेट्स एकमेकांच्या वर ठेवू नका. यामुळे हवा खेळती राहत नाही आणि डिव्हाइस अधिक गरम होऊ शकते. यासाठी कूलिंग पॅड किंवा स्टँड वापरणे हा उत्तम पर्याय आहे.

डिव्हाइस खूप गरम झाल्यास बंद करा
उन्हाळ्यात सततच्या वापरामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अधिक गरम होऊ शकतात. अशावेळी वरील स्टेप्स फॉलो करूनही डिव्हाइस थंड होत नसेल, तर ते काही वेळासाठी बंद करा. थंड झाल्यावरच पुन्हा सुरू करा, यामुळे त्याचे आयुष्यही वाढेल.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button