महाराष्ट्र

आई, मी पाडव्याला घरी येतोय… आणि काही क्षणांतच काळाने घात केला

करिअरला नवा आयाम मिळत असतानाच नियतीने वेगळाच खेळ केला


पोहेगाव : “आई, मी पाडव्याला घरी येतोय…” हे शेवटचं वाक्य उच्चारल्यानंतर अवघ्या काही तासांतच साहिल गुडघेच्या अपघाताची दुःखद बातमी घरच्यांपर्यंत पोहोचली. पाडव्याच्या आनंदात सामील होण्याची त्याची इच्छा अपघाताच्या छायेत हरवली आणि संपूर्ण कुटुंबाला शोकसागरात लोटून गेली.

सोनेवाडीचा 24 वर्षीय साहिल दिलीप गुडघे हा तुकाराम बाबुराव गुडघे यांचा नातू होता. त्याने एम. फार्मचे शिक्षण पूर्ण करून अमृतवाहिनी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून इंटर्नशिपला नुकतीच सुरुवात केली होती. करिअरला नवा आयाम मिळत असतानाच नियतीने वेगळाच खेळ केला. गुरुवारी संध्याकाळी सिन्नर-संगमनेर जुन्या रस्त्यावर स्विफ्ट कारच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

बुधवारी सायंकाळी साहिल मेसमधून जेवण करून पल्सरवरून रूमकडे निघाला होता. त्याच वेळी वेगात आलेल्या कारने त्याला जोरदार धडक दिली. पाडव्याच्या सुट्टीसाठी घरची मंडळी त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होती, मात्र पोहोचली ती केवळ त्याच्या अपघाताची दुर्दैवी बातमी.

बिग ब्रेकिंग : सांगोला-मिरज रोडवर दुचाकी-डमडमचा भीषण अपघातात, आई-मुलगा गंभीर जखमी

साहिलच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आईच्या डोळ्यांसमोर त्याचा तो शेवटचा फोन आणि “मी येतोय” हे शब्द कायमचे कोरले गेले आहेत. गावातील एक होतकरू आणि बुद्धिमान तरुण असे अचानक निघून जाणे, ही साऱ्यांसाठीच मोठी हानी ठरली आहे. या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला असून, अशा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button