
सांगोला/अविनाश बनसोडे : सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली जयहिंद (मा.सै.) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगोला तालुका, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमनुसार शेअर्स धारण करण्याच्या अटी व शर्तीनुसार नवीन सभासदत्व आणि शेअर्स विक्री सुरू आहे. ही विक्री आणि सभासदत्व ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.
सभासदत्व आणि शेअर्स खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे संस्थेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी माहिती दिली.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- रेशन कार्ड झेरॉक्स
- फोटो
ग्राहकांनी केवायसीची पूर्तता करणे आवश्यक आहे.
शेअर्स रक्कम: ३००० रुपये
- प्रवेश फी: १०० रुपये
- फॉर्म फी: ६० रुपये
- सेव्हिंग खाते: १०० रुपये
ज्या सभासदांची शेअर्स रक्कम ११०० रुपये आहे, त्यांनी उर्वरित रक्कम भरून ती ३००० रुपये करावी, असे चेअरमन सोमेश यावलकर यांनी इन पब्लिक न्यूजशी बोलताना सांगीतले.