धक्कादायक! सोलापूर विद्यापीठात एक कोर्स अनं ४ कोटी १ लाख ६० हजारांची अफरातफर? अधिकाऱ्यांकडून लुट ?
महाविद्यालयामध्ये विद्यापीठाने ठरवून दिलेल्या फी पेक्षाही जास्तीची फी आकारली जाते

सोलापूर/विशेष प्रतिनिधी : पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून कोर्स फीच्या नावाखाली जवळपास ४ कोटी १ लाख ६० हजारांची प्रत्येक सेमिस्टरला अफरातफर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांवर सक्ती, पण कोणताही फायदा होत नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा कोर्स करून घेतला जात आहे. यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून या कोर्ससाठी जास्तीचे पैसे घेतले जातात आणि विद्यापीठसुद्धा फी घेते. परंतु या सक्तीच्या कोर्सचा विद्यार्थ्यांना कोणताच फायदा नाही, ना त्यांना याचे सर्टिफिकेट दिले जाते,ना त्यांच्या मार्कशीटमध्ये याचे मार्क ग्राह्य धरले जाते,ना या त्यांचा शैक्षणिक वर्षात फायदा होतो, मग असा कोर्स विद्यापीठ का घेत असेल असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
धक्कादायक! सोलापूर विद्यापीठ, उ.शि.सहसंचालकांच्या संगनमताने प्राध्यापकांची लुट करत कोट्यावधींचा भ्रष्टाचार?
प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची लुट ?
विद्यापीठाने महाविद्यालयांना सक्ती कोर्स करून या संगनमताने कोट्यावधी रुपयांची फी गोळा करून अफरातफर केली जात आहे. प्रशासकीय अधिकारी गोळा केलेली फी कारणे दाखवत स्वतःच्याच तुंबड्या भरत आहेत, अशी सूत्रांनी माहिती दिली. तसेच विद्यापीठाने शैक्षणिक फी ठरवून दिली असताना महाविद्यालय ही फी घेते का? याची खातरजमा विद्यापीठ कधी करते का? अनेक महाविद्यालयामध्ये विद्यापीठाने ठरवून दिलेल्या फी पेक्षाही जास्तीची फी आकारली जाते आणि विद्यार्थ्यांना मोठे नुकसानीस सामोरे जावे लागते.
विद्यार्थी म्हणाले, मुलींना मोफत शिक्षणाची विद्यापीठाकडून अंमलबजावणी होत नाही, फोटोकॉपीसाठी जास्तीची फी आकारले जाते, निकालामध्ये सततची बोंबाबोंब आणि यामुळे विद्यापीठाची गुणवत्ता ढासळत चालली आहे असे अनेक सवाल करण्यात आले आहेत. जर या गोष्टींमध्ये बदल होत नसेल आणि विद्यार्थ्यांची लूट थांबत नसेल तर विद्यापीठावर मोर्चा काढून निषेध करण्यात येईल अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
धक्कादायक बाब आली समोर…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय दुर्दैव म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच माहीत नाही नक्की कोर्स कोणता घेतात आणि त्याची फी किती आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत इतर महाविद्यालयाचे दाखले दिले परंतु त्या महाविद्यालयात त्यांनी चौकशी केली असता महाविद्यालयांमध्ये देखील या कोर्स बद्दल काहीच माहिती नाही अशी धक्कादायक बाब समोर आली यावरूनच यांचा भोंगळ कारभार आणि विद्यार्थ्यांकडून केली जाणारी लूट उघड होत आहे, अशी सूत्रांनी माहिती दिली.
डॉ.लक्ष्मीकांत दामा, प्र.कुलगुरू म्हणाले,
इन पब्लिक न्यूजशी बोलताना प्र.कुलगुरू म्हणाले, विद्यापीठमधे सर्व कोर्सची फी ही ठरवून दिलेली आहे. त्यामुळे कॉलेजने ठरवून दिलेल्या फी पेक्षा जास्तीची फी आकारणी गैर आहे. जास्तीची फी आकारलेल्या महाविद्यालयाची तात्काळ चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.