मनोरंजन
जाह्नवी कपूरचा रेड ड्रेसमध्ये किलर लूक, चाहते झाले क्रेझी…
रेड शिमरी बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा किलर लूक…

नई दिल्ली:जाह्नवी कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि स्टायलिश अभिनेत्री आहे. जाह्नवीची स्टाइल आणि फॅशन सेन्स चाहत्यांना वेड लावते.

जाह्नवी कपूरने रेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिचे सुपर सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. रेड शिमरी बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा किलर लूक पाहण्यासारखा आहे. रेड ड्रेससोबत अभिनेत्रीने केसांना सॉफ्ट कर्ल्स देऊन मोकळे ठेवले आहेत. ग्लॉसी न्यूड लिपस्टिक, स्मोकी आय मेकअपमध्ये जाह्नवी खूप सुंदर दिसत आहे.

वेस्टर्न ड्रेससोबत अभिनेत्रीने स्टेटमेंट नेकलेस कॅरी केला आहे. तसेच मॅचिंग इअररिंग्सही घातले आहेत. या लूकमध्ये जाह्नवीने अनेक वेगवेगळ्या अंदाजात पोज दिल्या आहेत.

अभिनेत्रीचा इलेक्ट्रिफाइंग लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Akshara Singh : समाजात माणुसकी संपली आहे : अभिनेत्री अक्षरा सिंह