YouTuber Jyoti Malhotra arrested
नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशातील गद्दारांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. हरियाणाच्या हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्युबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांनी १७ मे रोजी तिला ताब्यात घेतले असून, तिच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.
गुप्त माहिती पाकिस्तानला पोहचवण्याचा आरोप
ज्योती मल्होत्रावर आरोप आहे की, तिने आणि तिच्या संपर्कातील काही इतर व्यक्तींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून भारतातील संवेदनशील माहिती गोळा केली आणि ती पाकिस्तानला पाठवली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, तिच्या संपर्कातील आणखी कोणी नेटवर्कचा भाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका
या प्रकारामुळे सोशल मीडियाचा गैरवापर करून देशाच्या सुरक्षेला कसा धोका पोहोचू शकतो, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण सोशल मीडियाच्या नियंत्रणाविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहे.
