सांगोला

युवकांनी भगवान परशुरामांची भक्ती जोपासावी- पो.नि.विनोद घुगे


सांगोला / प्रतिनिधी: भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार असुन माता रेणुका व पिता जमद्री ऋषीचे निष्ठावान सुपुत्र होते. आजच्या तरुण पिढीने व विद्यार्थ्यांनी परशुरामांची मातृभक्ती व पितृभक्ती अंगिकारावी चांगले संस्कार जोपासवेत, शरीर सुदृढ ठेवावे व परशुरामाप्रमाणे तेजस्वी व शूर बनण्याचा प्रयत्न करावा.

असे विचार सांगोल्याचे नूतन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यानी व्यक्त केले. भगवान परशुराम जयंती निमीत्त सांगोला शहरातील दत्त मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सरकारी वकील एड. सारंग वांगीकर, डॉ. शालिनी कुलकर्णी, प्रा. भगवंत कुलकर्णी, ह.भ.प. सुभाष लवूळकर, नागेश जोशी आदि उपस्थित होते..

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यानी भगवान परशुराम यांचे जीवन व कार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पो. नि. घुगे यांच्या हस्ते शालेय भेटवस्तुचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भगवान परशुराम यांचे विषयी समाजातील समज, गैरसमज, अपप्रचार व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यावर डॉ. शालिनी कुलकर्णी व ह.भ.प. सुभाष लवूळकर यानी प्रकाश टाकला.आजच्या काळात असे कार्यक्रम का आवश्यक आहेत, यावर प्रा. भगवंत कुलकर्णी यानी मार्गदर्शन केले.

कार्यक्रम सावरकर युवामंच, परशुराम युवामंच व ब्राम्हण सभा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मानस कमलापुरकर, सूत्रसंचालन ह.भ.प.श्रीपाद वांगीकर यानी केले. महप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

दत्तभक्त नंदूकाका लवूळकर याना भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार कुलकर्णी, सचिन बेले, कौस्तुभ भोसेकर, श्रीनिवास देशपांडे, संजय हसबनिस, श्रीकांत हसबनिस, निलेश ताकभाते, रवी कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, तेजस कुलकर्णी, ज्ञानेश्वर कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, एड. विशाल बेले, ज्ञानेश लवूळकर, श्रीनिवास देशपांडे यानी परिश्रम घेतले.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button