देश- विदेशसांगोला
सांगोला तालुक्यात खळबळजनक घटना; २२ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन केला जीवनाचा अंत
लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली

सांगोला/प्रतिनिधी: कराडवाडी कोळा (ता. सांगोला) येथे एका २२ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणामुळे घरासमोरील शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने सोमवारी सकाळी घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा मृत्यू उपचारांपूर्वीच झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुणाच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.