सांगोलामहाराष्ट्र
सांगोल्यात १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सांगोल्यातील आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

सांगोला / अविनाश बनसोडे : सांगोला शहरात एक दुर्दैवी घटना घडली असून, एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शहरातील स्टेशन रोड परिसरातील चिलारीच्या झाडाला या तरुणाने स्वतःला गळफास लावून जीवन संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनिष सोनू ठाकूर (वय १९, रा. बिहार) याने मंगळवार, दिनांक ११ मार्च रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी चिलारीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांनी तातडीने मृतदेह खाली उतरवून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.