देश- विदेशमहाराष्ट्र
धक्कादायक! सासुरवाडीत आलेल्या जावयाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवेढा/प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ३५ वर्षीय तरुणाने सासुरवाडीत आल्यानंतर मंदिराच्या परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बायको आजारी असल्याने तिच्या माहेरी पडोळकरवाडी येथे औषधोपचारासाठी गेली होती. त्यानंतर पती हुन्नूर येथे आले होते. मंदिर परिसरातील लिंबाच्या झाडाला पतीने दोरीने गळफास घेतला.
पोलिसांना घटनेची पाहणी केली यानंतर आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.