सांगोल्यात खळबळजनक घटना: २० वर्षीय तरुणीची घरातच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा

सांगोला/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गोडसेवाडी येथे 20 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीचे वय 20 वर्षे असून रा. गोडसेवाडी, ता.सांगोला असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, हिने घरातच पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.
गळफास घेतल्याचे पाहताच वडील यांनी तिला तात्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बनसोडे (पो.हे.क. 1242) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीसांनी बी.एन.एस.एस. कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!