चक्कsss १६ वर्षांच्या मुलाने मलायकाला केले इशारे,म्हणाली “तू”..!
मलायका अरोरा सध्या 'हिप हॉप इंडिया' सीझन २ चे परीक्षण करत आहे

हेमा हिरासकर : मलायका अरोरा सध्या ‘हिप हॉप इंडिया’ सीझन 2 चे परीक्षण करत आहे. नुकताच तिचा एक प्रोमो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मलायका 16 वर्षांच्या स्पर्धकावर खूप रागावली होती. मुलाने मलायकाला अश्लील इशारे केले होते, त्यानंतर मलायकाने त्याला चांगलेच फटकारले होते. आता अभिनेत्रीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. त्यानंतर तिने सर्वांसमोरच त्याची शाळा घेतली होती.
16 वर्षांच्या मुलाला फटकारल्यावर मलायका काय म्हणाली?
मलायका अरोरा सध्या ‘हिप हॉप इंडिया’ सीझन 2 चे परीक्षण करत आहे. याची सुरुवात 14 मार्चपासून झाली आहे. मलायकासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूजा देखील परीक्षक म्हणून दिसत आहे. नुकताच तिचा एक प्रोमो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मलायका एका मुलावर खूप रागावली होती.
16 वर्षांच्या एका स्पर्धकाने मलायकाला कधी फ्लाइंग किस दिली, तर कधी डोळा मारला. मुलाची ही कृती अभिनेत्रीला अजिबात आवडली नाही. आता तिने माध्यमांना बोलताना सांगितले की, “त्यावेळी माझा त्याला फटकारण्याचा अजिबात हेतू नव्हता. तू जे करत आहेस ते चुकीचे आहे, हे सांगण्याचाही हेतू नव्हता. तू जे करत आहेस ते खूप जास्त होत आहे, हेच मी त्याला समजावून सांगत होते. इतके काही करण्याची गरज नाही.”असे टी म्हणाली.