झोजिला बोगद्याचे ७०% काम पूर्ण,मंत्री नितीन गडकरी म्हणाले…
झोजिला बोगद्यामुळे श्रीनगर-लेह महामार्ग वर्षभर सुरू राहणार

विशेष प्रतिनिधी : जम्मू-काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या आशियातील सर्वात लांब झोजिला बोगद्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, 2026 पर्यंत ते पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.
हा 13 किलोमीटर लांबीचा बोगदा लडाखचा भारताच्या मुख्य भूभागाशी संपर्क कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हिवाळ्यात होणाऱ्या तीव्र बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरित भारताशी संपर्क तुटतो, त्यामुळे नागरिक आणि लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. झोजिला बोगद्यामुळे श्रीनगर-लेह महामार्ग वर्षभर सुरू राहणार आहे.
भारताच्या शेजारील “या” देशात भूकंपाचा हादरा!
सुरुवातीला या प्रकल्पाचा खर्च 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रभावी व्यवस्थापनामुळे तो आता 5,500 कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. गडकरी यांनी सांगितले की, हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुलभ होईल आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेलाही मोठा फायदा होईल.