देश- विदेश

लग्नाचं आमिष देत महिलेला फसवलं;  फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले


अहमदनगर / प्रतिनिधी:  ऑनलाइन विवाह जुळवणी संकेतस्थळाच्या माध्यमातून एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिची फसवणूक करून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याची गंभीर घटना केडगावमध्ये घडली आहे. पीडित ३७ वर्षीय महिलेनं कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर परिसरातील ही महिला आपल्या दुसऱ्या लग्नासाठी ‘शादी डॉट कॉम’वर प्रोफाइल तयार करून योग्य जोडीदाराचा शोध घेत होती. याचदरम्यान एका तरुणाने तिच्याशी संपर्क साधत आपणही घटस्फोटित असून पुन्हा लग्न करू इच्छित असल्याचे सांगितले. सुरुवातीला दोघांमध्ये संवाद होऊन महिलेनं आपल्या पालकांशी यासंदर्भात चर्चा केली.

तरुण महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी आला आणि विश्वास संपादन करत लग्नासाठी नवीन घर घ्यायचं आहे, म्हणून तिला तीन महिने वेळ देण्याची विनंती केली. या विश्वासावर महिलेकडून त्याने घर खरेदीसाठी तब्बल १ लाख ८० हजार रुपये घेतले.

यानंतर १ एप्रिल रोजी पीडित महिला तरुणाला भेटण्यासाठी गेली असता, त्याने तिला शिर्डी व शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी नेले. तिथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

जेव्हा महिलेने आणखी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा तरुणाने त्यांच्या वैयक्तिक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याचे सांगून त्याच्या आधारे तिची बदनामी करण्याची धमकी दिली. या धक्क्याने पीडित महिलेने तिच्या कुटुंबीयांना सगळा प्रकार सांगितला.

१ मे रोजी पीडित महिला केडगाव येथे पुन्हा एकदा तरुणाला भेटण्यासाठी आली असता, लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, त्याने उत्तरे दिले नाही. व शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

कोतवाली पोलिसांनी संबंधित तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर संबंध जुळवताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांना कडून करण्यात आले आहे.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button