महाराष्ट्र

नगर बसस्थानकासमोर भरदुपारी थरार! महिलेला गळा दाबून…

महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक किती सुरक्षित आहे


अहिल्यानगर/प्रतिनिधी : नगर बसस्थानकाच्या सुरक्षेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक किती सुरक्षित आहे, यावर सतत चर्चा होत असताना, भरदुपारी नगर बसस्थानकासमोर धक्कादायक घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिक्रापूरहून नगरकडे येणाऱ्या एका खाजगी प्रवासी कारमध्ये महिलेवर हल्ला करण्यात आला. कारचालकाने तिचा गळा दाबत आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले. त्यानंतर तिला भररस्त्यात गाडीबाहेर ढकलून तो पसार झाला. 

ही घटना स्वस्तिक चौकातील पुणे बसस्थानकासमोर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button