
विशेष प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या तयारीने उत्साहात सर्वच शहरे न्हाऊन निघाले आहे. विविध जाती-धर्मातील नागरिक, तरुण मंडळी, संस्था एकत्र येऊन उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मात्र गेल्या काही वर्षांत डीजे संस्कृतीमुळे या पारंपरिक उत्सवांना गालबोट लागत आहे. डीजेमुळे होणारा प्रचंड आवाज, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच लेझर लाईट्समुळे होणारा त्रास यावर वैद्यकीय तज्ज्ञही गंभीर इशारा देत आहेत.
शहरातील सामाजिक संघटनांनी आवाहन केले आहे की, भारतीय पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्सव साजरा करावा, जेणेकरून आरोग्यदायी व शांततामय वातावरणात सणाचा आनंद लुटता येईल.
गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात पारंपरिक ढोल-ताशांचा नाद गुंजावा आणि आरोग्यदायी आनंदाने उत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.