पेन्शनधारकांनी का भरावा आयटी रिटर्न
रिटर्न न भरल्याने कुटुंबाला नुकसानभरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते.

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची माहिती:
अनेक निवृत्तीवेतनधारक बँकेत फॉर्म १६ वर स्वाक्षरी करून ज्येष्ठ नागरिकत्व सवलतीचा दावा करत असले तरी ते आयटी रिटर्न भरत नाहीत. मात्र, शून्य टॅक्स असतानाही आयटी रिटर्न भरला नाही तर ते एका मोठ्या सुविधेपासून वंचित राहू शकतात.
Income Tax : नवीन आयकर विधेयक, हे असतील महत्त्वाचे बदल
म्हैसूरचे वकील एन. व्ही. नागराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनरच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या वेळी आयटी रिटर्न भरल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा फायदा होतो. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १६६ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१३ च्या निकालानुसार, अपघाती मृत्यू झालेल्या निवृत्तीवेतन धारकाच्या कुटुंबाला मागील तीन वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या १० पट नुकसानभरपाई मिळण्याचा हक्क आहे.
जर पेन्शनधारकाची मासिक पेन्शन २५,००० रुपये असेल तर वार्षिक उत्पन्न ३,००,००० रुपये होईल. मागील तीन वर्षांचे सरासरी उत्पन्न देखील ३,००,००० रुपये धरल्यास, त्याच्या कुटुंबाला ३०,००,००० रुपये नुकसानभरपाई मिळू शकते. मात्र, ही रक्कम मिळण्यासाठी पेन्शनधारकाने नियमित आयटी रिटर्न भरलेला असावा. कोर्टाद्वारे इतर कोणताही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही.