नवी दिल्ली : Operation Sindoor पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने मंगळवार-बुधवारच्या रात्री पाकिस्तान व पीओकेतील (POK) अनेक दहशतवादी तळांवर जोरदार स्ट्राइक केली. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. या ऑपरेशनबाबत परराष्ट्र मंत्रालय, भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरैशी यांनी परराष्ट्र सचिव मिसरी यांच्यासह माहिती दिली.
या पत्रकार परिषदेमध्ये रात्री १ ते १:३० दरम्यान पाकिस्तानातील लक्ष्यांबाबत नावं व तपशील दोघी अधिकाऱ्यांनी उघड केले. कर्नल सोफिया कुरैशी, सिग्नल कोरमधील अधिकारी, यांनी हिंदीमध्ये माहिती दिली, तर विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी इंग्रजीतून माहिती दिली. यानंतर दोघी महिला अधिकारी देशभर चर्चेचा विषय ठरल्या.
कोण आहेत कर्नल सोफिया कुरैशी?
गुजरातच्या वडोदऱ्याची रहिवासी असलेल्या सोफिया कुरैशी भारतीय लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत. त्या सिग्नल कोरमध्ये सेवा बजावत आहेत. वयाच्या १७व्या वर्षी १९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या काळात त्यांनी शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे लष्करात प्रवेश केला.
२०१६ मध्ये झालेल्या बहुराष्ट्रीय क्षेत्रीय प्रशिक्षण सरावात त्यांनी भारतीय लष्कराच्या प्रशिक्षण पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांचा पारिवारिक पार्श्वभूमीही सैन्याशी संबंधित आहे. २०१७ मध्ये एका सामूहिक चर्चासत्रात त्यांनी लष्करातील प्रवास व प्रेरणेबाबत अनुभव शेअर केला होता.
#WATCH | Vadodara, Gujarat | Col Sofiya Qureshi briefed the media today on #OperationSindoor. Her mother, Halima Qureshi, says, "We have avenged the sindoors of our sisters and mothers… Sofiya wanted to follow in the footsteps of her father and grandfather, who were also in the… pic.twitter.com/1ZmtVD5Wn4
— ANI (@ANI) May 7, 2025
#WATCH | Vadodara, Gujarat | Col Sofiya Qureshi briefed the media today on #OperationSindoor. Her father, Taj Mohammed Qureshi, says, "We are very proud. Our daughter has done a great thing for our country… Pakistan should be destroyed… My grandfather, my father, and I were… pic.twitter.com/mJ6AY6dWAT
— ANI (@ANI) May 7, 2025
कोण आहे विंग कमांडर व्योमिका सिंग?
विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय हवाई दलात अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी इंग्रजीमध्ये पत्रकार परिषद घेत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांचे संयमित भाषण आणि तळमळीची माहिती देशवासीयांच्या मनावर अधोरेखित झाली.
या दोन ‘रणरागिणी’ आता ऑपरेशन सिंदूरच्या आवाज बनल्या आहेत आणि त्यांच्यावर संपूर्ण देश अभिमान व्यक्त करत आहे.
