मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज सकाळी मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात उपोषण सुरू करताच त्यांनी आपल्या समर्थकांना शिस्त आणि संयम पाळण्याचे कठोर आवाहन केले. आंदोलकांची प्रचंड गर्दी असतानाही कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यावर त्यांनी विशेष भर दिला.
पाहा मागण्या काय आहेत ?
1. मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी केली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा. सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या, तसेच सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे तात्काळ मागे घ्या.
5. आम्हाला कायद्यात बसणारे आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
