
मुंबई / प्रतिनिधी :मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या सोनालीने नुकतेच समुद्रकिनाऱ्यावरील बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

सोनालीने फोटो शेअर करताना “Coz ‘it’ is getting hotter and younger?” असे लक्षवेधी कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून,

“अशी बी दिसतेस, तशी बी दिसतेस, काय तुझ्या रूपाची शोभा, माझी रंभा गं!” अशा कमेंट्समधून तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक होत आहे.

सोनाली कुलकर्णीचा हा ग्लॅमरस आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.

तिचे हे नवे फोटो चाहत्यांसाठी पर्वणी ठरत असून, अनेकांनी “सोनाली अजूनही तरुण आणि तितकीच आकर्षक दिसते” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
