देश- विदेश

लग्न झालं पत्नीच्या डोक्यावरचा पदर काढला अनं नवरदेव हे पाहून जागीच हादरला…


आधीच लग्न जमेनात आणि फसवणुकीचे वाढले प्रमाण!

विशेष / वृत : लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र बंधन… पण जर वधूच्या ऐवजी तिचीच आई नवरी म्हणून समोर आली तर? उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याने सर्वत्र खळबळ माजवली आहे.

तरुणाच्या नशिबात ‘सासू’, वधूच्या नावावर चालली लग्नाची संपूर्ण तयारी

२२ वर्षीय मोहम्मद अझीम याचं लग्न शामली जिल्ह्यातील २१ वर्षांची मंताशा हिच्याशी ठरवण्यात आलं होतं. लग्नाच्या सर्व तयारीनंतर, ३१ मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे निकाह सोहळा पार पडला. मात्र, त्या सोहळ्यात एक अस्वस्थ करणारा क्षण आला, जेव्हा मौलवीने वधूचं नाव ‘मंताशा’ऐवजी ‘ताहिरा’ लिहिलं.

“पदर उचलला आणि हादरलो” – अझीमची तक्रार

अझीमच्या म्हणण्यानुसार, निकाहनंतर जेव्हा त्याने वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, तेव्हा समोर मंताशा नव्हे, तर तिची ४५ वर्षीय विधवा आई ताहिरा होती! हा प्रकार लक्षात येताच अझीमने विरोध दर्शवला. विशेष म्हणजे, त्याच्या म्हणण्यानुसार या विवाहासाठी तब्बल ५ लाख रुपये दिले गेले होते.

धमकी आणि तडजोड

अझीमने आरोप केला की, या फसवणुकीला विरोध करताच त्याचा मोठा भाऊ नदीम आणि वहिनी शाइदा यांनी त्याला बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. अखेर, अझीमने थेट पोलिस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली.

प्रकरण मिटले, पण चर्चा सुरुच! ब्रह्मपुरीच्या सीओ सौम्या अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाली आहे आणि अझीमने तक्रार मागे घेतली आहे. “मला हे प्रकरण पुढे नेायचं नाही,” असं अझीमने स्पष्ट केलं आहे. मात्र, या प्रकरणाची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असून, अनेकजण अशा प्रकारच्या फसवणुकीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button