मुंबई/प्रतिनिधी: मे महिन्याची सुरुवात होताच महाराष्ट्राच्या हवामानात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळतेय. एका बाजूला तापमानाची प्रचंड वाढ, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. येत्या २४ तासांत राज्यात उष्णतेचा तडाखा तर काही भागांत पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा अलर्ट – पुढील २४ तास असे असतील
- पूर्वोत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपिटीची शक्यता.
- उत्तर व मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवणार.
- दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घसरण, परंतु दमट हवामानामुळे उष्मा जाणवणार.
- मुंबई व उपनगरांमध्ये तापमान २-३ अंशांनी घटणार, मात्र आर्द्रतेमुळे घामाघूम वातावरण कायम राहील.
- मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक.
मराठवाडा-विदर्भात पावसाचे संकेत
तापमानाने कळस गाठला असतानाच, काही भागांत ढगाळ हवामानाची आणि हलक्या पावसाच्या शक्यतेची नोंद आहे.
धाराशिव, लातूर, नांदेड यांसारख्या भागांमध्ये दोन ते पाच दिवसांमध्ये हलक्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे उष्णतेपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता.
मे महिना: उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार
- मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.
- मध्य भारत, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता अधिक असेल.
- उत्तर किनारपट्टी वगळता, महाराष्ट्रात उन्हाळी पावसाच्या शक्यता आहेत.
नागरिकांना हवामानाविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
राज्यातील नागरिकांनी उष्णतेच्या लाटेला सामोरे जाण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. पाण्याचे सेवन वाढवावे, उन्हापासून बचाव करावा आणि गरज नसल्यास दिवसा बाहेर जाणे टाळावे.
