महाराष्ट्रात हवामानाचा इशारा: पुणे, कोल्हापूर, सांगली धोक्याच्या वळणावर? ५ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट!

पुणे/प्रतिनिधी : तापमानात वाढ, आकाश ढगाळणार?
पुण्यात तापमान ३९.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आज कमाल तापमान ४० अंश आणि किमान १९ अंश राहण्याची शक्यता आहे. सकाळी वातावरण निरभ्र असले तरी दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होणार आहे.
सातारा : गडगडाटी पावसाचा इशारा
साताऱ्यात कमाल तापमान ३९ अंश, किमान २१ अंश राहण्याची शक्यता आहे. येथे विजांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
सांगली : विजांचा यलो अलर्ट
सांगलीत आकाश ढगाळ होत असून, विजा आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. येथे तापमान ३९ अंश (कमाल) आणि २३ अंश (किमान) राहण्याचा अंदाज आहे.
कोल्हापूर : ४८ तास ढगाळ वातावरण
कोल्हापुरात पुढील दोन दिवस ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. येथे हलक्याशा पावसाबरोबर विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. तापमान ३९ अंश (कमाल) आणि २२ अंश (किमान) राहील.
सोलापूर : ४१ अंश तापमान, वादळी पावसाचा धोका
सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा कडाका वाढला असून कमाल तापमान ४१ अंशांवर पोहोचले आहे. विजांचा कडकडाट, अंशतः ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता असल्याने याठिकाणीही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सावधगिरी हाच उपाय!
राज्यात बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना वेळेत करण्याचे आवाहन केले आहे.