टेंभु प्रकल्पाच्या पाणी व्यवस्थापनावर महत्त्वाची बैठक, जलसंपदा मंत्री, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यात चर्चा

मुंबई/सहदेव खांडेकर : सांगोला तालुक्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व इंजीनीयर राजेंद्र रेडीआर यांच्या समवेत आज मुंबई येथे बैठक पार पडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीमध्ये आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी टेंभुच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली. तसेच सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे व टेंभु योजनेच्या माध्यमातुन सर्व बंधारे भरुन घेण्याची मागणी करण्यात केली आहे.
पाणी वाटप कायद्यानुसार टेल टु हेड पाण्याचे वाटप करावे अशी मागणी करण्यात आली. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.
डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयात तुफान खडाजंगी? झोपलेल्या संस्थाचालकांना जागे होण्याही गरज !
दरम्यान, टे़भुचे पाणी आले म्हणजे काम झाले आसे नाही तर त्या पाण्याचे योग्य पध्दतिने नियोजन करणे गरजेचे आहे यावर पुढील काळात योग्य नियोजन केले जाईल असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगीतले. चालू उन्हाळी आवर्तनातुन नदीला पाणी सोडण्या बरोबरीने बंधारे भरुन घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले व सदर नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही असेही त्यांनी सांगितले.