देश- विदेशमहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी करण्यात सुशील आगरवाल यांचा जामीन रद्द


नगर / प्रतिनिधी: नगर अर्बन मल्टीस्टेट को. ऑप. बँकेच्या कर्जदार, संचालक व कर्मचारी यांचे विरुध्द अहमदनगर कोर्टामध्ये आर्थिक भ्रष्टाचाराचा खटला दाखल असुन त्याचे कामकाज मा. सेशन्स जज्ज .एम.एच. शेख यांचे कोर्टात चालु आहे.

सदरच्या केसमध्ये सुशिल घनशाम अगरवाल हे कर्जदार असुन त्यांनी मे. कोर्टात अटक पुर्व जामीन अर्ज क्र. ८४५/२०२४ असा दाखल केलेला होता. सदरचा अर्ज दाखल झाल्यानंतर आगरवाल यांचेतर्फे कर्जाची सर्व रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती व मे. कोर्टाने त्यांचे या म्हणण्यावर विश्वास ठेवून त्यांना अटकपूर्व जामीन दिलेला होता.

सदरचे अटकपूर्व जामीनाचे अर्जावर कोर्टाने त्यांना अर्जाचा हुकूम झाल्यापासून एक महिन्याचे आत अवसायक यांचेबरोबर समक्ष चर्चा करुन सर्व रक्कम भरणे संदर्भात भेट घ्यावी. ही अट व शर्त असतांना त्यांनी एक महिन्याचे आत अवसायक यांचेबरोबर बोलणी केली नाही.

परंतु कोर्टात या ना त्या कारणाने अर्ज करुन कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिल्याचा गैरफायदा घेवून सातत्याने काम ्लांबवत ठेवले व अटकपूर्व जामीनाचा गैरफायदा घेतला. अवसायक यांनी एकरकमी परतफेड योजनेचा त्यांना लाभ मिळावा म्हणुन सातत्याने पत्र देवून पाठपुरावा केला असतांनाही त्यांनी पैसे भरण्याऐवजी केस लांबवत ठेवण्याचा प्रकार चालूच ठेवला.

यामध्ये फिर्यादीतर्फे त्यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज देण्यात आला होता. त्यासही कोर्टाने परत एक महिन्याची मुदत देवून कर्ज तडजोड करणेबाबत मुदत देवूनही अगरवाल यांचेतर्फे सातत्याने प्रत्येक वेळेला मुदत मागण्यात आली.

या सर्वांचा विचार करुन कोर्टाने दि. १६.०५.२०२५ रोजी अर्जदार अगरवाल यांनी शर्तीचा व अटीचा भंग केला असल्यामुळे व त्यांचे एकंदर वर्तन हे न्यायालयास योग्य न वाटल्याने तसेच अगरवाल तर्फे उच्च न्यायालयात रिव्हीजन दाखल केल्याचे व त्यामध्ये चौकशी झालेली आहे. असे सांगितले असता सरकारी वकील . एम. व्ही. दिवाणे यांनी कोर्टामध्ये उच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिव्हीजनचा सर्व रोजनामा कोर्टात दाखल केला व अद्याप कुठलाही त्यामध्ये हुकूम झालेला नाही.

असे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे कोर्टाने अगरवाल हे सातत्याने काम पुढे ढकलत असल्याचे लक्षात घेवून त्यांना दिलेला अटकपूर्व जामीन रद्द केलेला आहे. सदरचे केसमध्ये फिर्यादी व ठेवीदारातर्फे ॲड अ. स. पिंगळे यांनी पाहीले व सरकार तर्फे ॲड. एम. व्ही. दिवाणे यांनी काम पाहीले.

आणखी काही आरोपींचे जामीन रद्द झालेले आहेत. संबधित आरोपींना अटक करणेचे माननीय न्यायालयाचे निर्देश

अभिनंदन अँड अच्युत पिंगळे साहेब आपल्या प्रभावी युक्तीवादामुळे व सरकारी वकील अँड मंगेश दिवाणे आपण ठेवीदारांची बाजू पोटतिडकेने मांडली.आता बँक बंद पडली पैसे भरावे लागणार नाहीत असा गैरसमज असणारे कर्जदारांना मोठी चपराक. संचालक मंडळाला टक्केवारी दिली होती.

आता कशाला पैसे भरायचे असा विचार करु नका बँकेचे पैसे परत करा..नाहीतर कारवाईला तयार रहा बँक बचाव समिती पाठपूरावा सोडणार नाही.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button