सावधान! उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग; सांगोला,पंढरपूर,मंगळवेढा नदी काठच्या गावांना इशारा

सोलापूर : भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीचे निर्णयानुसार नुसार भीमा नदीवरील पिण्याचे पाणी आवर्तन उद्या दिनांक 08.04.2025 रोजी सकाळी ९ वाजता उजनी धरण विद्युत गृह विद्युतगृह मधून सुरुवातीस 1600 इतका विसर्ग सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर,सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतसाठी पिण्याचे पाणी योजनांसाठी सोडण्यात येणार आहे. तसेच सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे.
तरी भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे ही विनंती.