
सांगोला/ महेश लांडगे : संस्कृतीच्या संवर्धनामध्ये मातृभाषेचा वाटा महत्त्वाचा असतो. त्यासाठी मात्र भाषेतील साहित्य वाचणे महत्त्वाचे असते. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही महाराष्ट्रवाशीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आज समाज माध्यमाच्या युगात मराठी भाषेची मोडतोड होत असली, तरी या माध्यमांमुळे मराठी सर्व दूर पोहोचत आहे हे स्पष्ट करून , मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वैद्यकीय अभियांत्रिकी आणि कायद्याचे शिक्षण मराठी भाषेत मिळायला हवे. न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा शंभर टक्के वापर झाल्यास न्याय व्यवस्थेवरील लोकांचा असलेला विश्वास दृढ होईल असे मत प्रा.संतोष लोंढे यांनी व्यक्त केले. सांगोला न्यायालयामध्ये तालुका विधी सेवा समिती आणि विधीज्ञ संघ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस.एम.घुगे यांनी भूषविले. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती बी.एम. पोतदार, सह दिवाणी न्यायाधीश कस्तर तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती. के.बी.सोनवणे, सह दिवाणी न्यायाधीश कस्तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.साळुंखे विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. आर पी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.सी.व्ही.बनकर यांनी केले सूत्रसंचालन अॅड. एस.व्ही.धनवडे यांनी केले.
आभार ज्येष्ठ अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले. यावेळी सांगोला न्यायालयाचे अधिकारी, कर्मचारी, विधीज्ञ संघाचे पदाधिकारी, सर्व वकील, पक्षकार आणि नागरिक उपस्थित होते.