RTO मोठा निर्णय! जुनी वाहने खरेदी-विक्री करताय? तर या गोष्टी पाहिल्या का!

पुणे/प्रतिनिधी : वाहन बाजार देशातील सर्वात गतीमान बाजार मानला जातो. दररोज हजारो जुनी वाहने खरेदी-विक्री होतात. पण यामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आता RTO नं थेट कारवाई केली आहे.
RTO चे नविन धोरण?
पुणे RTO ने आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये जुनी वाहने विकणाऱ्या डीलर्सना अधिकृत परवाना मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. मोटर वाहन कायदा कलम 29A अंतर्गत हे धोरण लागू केलं जात आहे.
असे आहेत निर्णय :
• जुनी वाहने खरेदी-विक्रीसाठी डीलरकडे आता अधिकृत RTO परवाना असणे बंधनकारक
• व्यवहार झाल्यानंतर वाहनाची नोंद नवीन मालकाच्या नावावर त्वरित होईल
• मूळ मालकावर कोणतीही जबाबदारी राहणार नाही
• खरेदीदाराला मिळेल कायदेशीर मालकी आणि पारदर्शक व्यवहार
• विमा, कर्ज व टॅक्स प्रक्रिया अधिक सुलभ
गैरव्यवहारांना आळा बसणार!
पूर्वी अनेक वेळा असे घडत होते की गाडी विकल्यावरही तिची नोंद जुना मालक म्हणूनच राहायची. यामुळे जर गाडीचा गैरवापर झाला, अपघात किंवा गुन्हा घडला, तर मूळ मालक अडचणीत यायचा.
आता ही साखळी तोडण्यासाठीच RTO चं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं आहे.
पुणे RTO चा हा निर्णय केवळ व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठं पाऊल आहे.