Donald Trump on Israel Iran War: अमेरिका-इस्रायल-इराण (Iran Israel War) यांच्यातील युद्धाचा आजचा 14 वा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून हल्ले सातत्याने तीव्र होत आहेत. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे पहिले सार्वजनिक निवेदन जारी केले. त्यांनी अमेरिकेला मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळ बंद करण्याचा इशारा दिला, अन्यथा त्यांच्यावर हल्ले सुरूच राहतील, असेही ते यावेळी म्हणाले.
तर दुसरीकडे इराण मधील नेतृत्व हार मानणारे नाही, इराणची विद्यमान राजवटही कोसळण्याच्या परिस्थितीत नाही, असा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचा अहवाल आहे. त्यामुळे अमेरिका इजराइल विरुद्ध इराण संघर्ष अधिक चिघळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच इराणचे आज काय हाल होईल, हे फक्त बघा, अशा प्रखर शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एकप्रकारे नवी धमकी दिली आहे. त्यामुळे आता आखाती देशात पुढे नेमकं काय काय घडतंय? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. (US Israel Iran War)
अमेरिकेचा 47वा राष्ट्राध्यक्ष म्हणून हि किती सन्मानाची गोष्ट (Donald Trump on Israel Iran War)
ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले कि, ‘इराणचे नौदल नष्ट झाले आहे, त्यांचे हवाई गेले आहे, त्यांचे क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर सर्व काही नष्ट होत आहे आणि त्यांचे नेते पृथ्वीवरून गायब गेले आहेत. आमच्याकडे अतुलनीय अग्निशक्ती, अमर्याद दारूगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या वेड्या बदमाशांचे काय होते ते पहा. ते 47 वर्षांपासून जगभरातील निष्पाप लोकांना मारत आहेत आणि आता मी, अमेरिकेचा 47वा राष्ट्राध्यक्ष म्हणून, त्यांना मारत आहे. असे करणे किती सन्मानाची गोष्ट आहे.’ असेही ट्रम्प म्हणालेय.
