देश- विदेशEconomy

Budget 2025: मध्यमवर्गीय नोकरदारांना सरकारची मोठी भेट…

आयकर अधिनियमाच्या कलम 17 अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी


नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. सरकारने 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना करमुक्ती देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी नोकरदार आणि मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, यासोबतच आणखी एक मोठे आर्थिक लाभ सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे परदेशात उपचार करणे आणखी सोपे होणार आहे.

परदेशातील वैद्यकीय उपचारांवर करसवलत

सरकारने नोकरदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात वैद्यकीय उपचारासाठी होणाऱ्या खर्चासंदर्भात मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री यांनी जाहीर केले की, कोणताही कर्मचारी किंवा त्याचा कुटुंबीय परदेशात उपचारासाठी प्रवास करीत असल्यास, त्यासाठी कंपनीकडून मिळणाऱ्या खर्चाच्या सवलतीवर कर लागणार नाही.

सध्या अशा करमुक्त सुविधेची मर्यादा 2 लाख रुपये आहे. मात्र, सरकार लवकरच ही मर्यादा वाढवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. इनकम टॅक्स विभागाने यासंदर्भात एक FAQ जारी करून लोकांची संभ्रमावस्था दूर केली आहे.

कोणाला मिळणार लाभ?

  • परदेशात स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणाचाही उपचार करायचा असल्यास हा लाभ घेता येईल.
  • आयकर अधिनियमाच्या कलम 17 अंतर्गत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • नियोक्ता (कंपनी) कर्मचार्‍यासाठी किंवा त्याच्या कुटुंबीयांसाठी केलेल्या वैद्यकीय खर्चाला करसवलत मिळेल.

कधी लागू होणार नवा नियम?

परदेशातील उपचारांसाठी करसवलतीचा हा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. मूल्यांकन वर्ष 2026-27 आणि त्यानंतरच्या सर्व वर्षांसाठी हा नियम लागू राहील.

हा निर्णय नोकरदार वर्गासाठी मोठी दिलासा देणारी बाब आहे आणि भविष्यात वैद्यकीय उपचारांवरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button