आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ; मूळ पगार १८ हजारवरून ५० हजार

दिल्ली : केंद्र सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) स्थापना जाहीर केली असून, या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, काही अहवालांनुसार कर्मचाऱ्यांचा सध्याचा मूळ पगार १८ हजारावरून थेट ५० हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुख्य घटक असतो.
– सहाव्या वेतन आयोगात हा फॅक्टर १.८६ होता.
– सातव्या वेतन आयोगात तो २.५७ निश्चित करण्यात आला.
– आठव्या वेतन आयोगात तो २.२८ ते २.८६ दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर हा फिटमेंट फॅक्टर २.८६ वर निश्चित केला गेला, तर कर्मचाऱ्यांच्या पगारात ४०-५०% पर्यंत वाढ होऊ शकते.
पगारवाढीचे आकडे :
– सध्याचा मूळ पगार : २०,०००
– नवीन पगार (२.८६ फॅक्टरनुसार): २०,००० × २.८६ = ५७,२००
किमान वेतन आणि पेन्शन वाढीचा अंदाज :
– किमान मूळ पगार : १८,००० वरून ५१,४८०
– किमान पेन्शन : ९,००० वरून २५,७४०
यासोबत मिळणार इतर फायदे :
– महागाई भत्ता (DA) : नवीन पगारानुसार यामध्येही वाढ होण्याची शक्यता.
– घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि इतर भत्त्यांमध्ये सुधारणा.
– कामगिरी वेतन (Performance-based pay) लागू होण्याची शक्यता.