सांगोला

“मोबाईल हप्त्याच्या वादातून तरुणावर हल्ला; चार्जरच्या वायरने गळा आवळण्याचा प्रयत्न”


सांगोला / प्रतिनिधी :  मोबाईलचे थकलेले हप्ते भर का नाहीस, असा प्रश्न विचारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीवर तणावात आल्याने नात्यातील तरुणाने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुन्हाडीच्या दांड्याने पाय आणि हातांवर मारहाण केली. ही घटना सांगोला तालुक्यातील महीम गावात संध्याकाळी ५ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , या फिर्यादीने सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, तरुणा वर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या नात्यातील तरुणाकडून वापरासाठी आपल्या नावावर मोबाईल खरेदी करून दिला होता. त्याचे हप्तेही तेच भरत होते. मात्र, काही हप्ते थकलेले असल्याने फिर्यादीने विचारणा केली. त्यावरून रागावून तरुणाने शिवीगाळ केली व “मोबाइल तुझा, तू घेऊन जा,” असे म्हणत जबरदस्तीने हल्ला केला.

हल्ल्यात फिर्यादीच्या गळ्यावर मोबाईल चार्जरच्या वायरने आवळण्याचा प्रयत्न केला गेला, तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने डाव्या पायावर व दोन्ही हातांवर वार करून तेथून पळून गेला, अशी माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button