शैक्षणिकमहाराष्ट्रसांगोला

फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला युजीसीकडून ऑटोनॉमस दर्जा प्रदान

‘ऑटोनॉमस दर्जा’ शैक्षणिक वर्षे २०२५ ते २०३५ अशा एकूण दहा वर्षांसाठी मिळाला


सांगोला/स्वप्नील ससाणे : येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्चला देशातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण असलेला ‘स्वायत्त’ अर्थात  ‘ऑटोनॉमस दर्जा’ प्राप्त झाला आहे. तो शैक्षणिक वर्षे २०२५ ते २०३५ अशा एकूण दहा वर्षांसाठी मिळाला आहे. फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च या  संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजाच्या उत्कृष्टतेची दखल घेत युजीसीने हा निर्णय घेतला असून, यामुळे महाविद्यालयाच्या वाटचालीत मानाचा तुरा रोवला गेला आहे. युजीसी  (युनिव्हर्सिटी ग्रँटस कमिशन) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे  यांच्याकडून तसे पत्र महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले असल्याची माहिती, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग रिसर्चचे प्राचार्य डॉ. रविद्र शेंडगे  यांनी दिली.

या स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला आता स्वतःचा अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा पद्धती निश्चित करणे आणि मूल्यमापनाचे निकष ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, महाविद्यालयाला उद्योग आणि संशोधन संस्थांसोबत सहकार्य करून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यास मदत करता येणार आहे. या स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

प्रवाश्यांना रेल्वेचा मोठा फटका! एसी लोकल धावणार नॉन-एसी

या स्वायत्ततेमुळे फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्चच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात अधिक सखोल ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल आणि ते भविष्यात यशस्वी व्यावसायिक बनू शकतील, असा विश्वास फॅबटेक एज्युकेशन सोसायटी चे सचिव डॉ.अमित रुपनर यांनी  व्यक्त केला आहे.

 या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे म्हणाले, “युजीसीने दिलेला हा स्वायत्तता दर्जा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे तांत्रिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या स्वायत्ततेमुळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल.”

फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्चने नेहमीच उच्च दर्जाचे शिक्षण देत आहे . या स्वायत्ततेमुळे महाविद्यालयाला शैक्षणिक क्षेत्रात अधिक योगदान देण्याची संधी मिळेल आणि ते विद्यार्थ्यांना चांगले भविष्य घडवण्यास मदत होईल .तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा वाढली आहे ,आणि  शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श संस्था म्हणून ओळखली जात आहे .

फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, सचिव डॉ.अमित रुपनर,कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, उप प्राचार्य प्रा.डॉ विद्याराणी क्षीरसागर तसेच शिक्षकवृंद ,विद्यार्थी,व पालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्चची प्रतिष्ठा आणखी उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“ हा स्वायत्तता दर्जा आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत संशोधनासाठी मिळालेल्या मेहनतीचे फळ आहे. या संधीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.”

– डॉ.अमित रुपनर , सचिव ,फॅबटेक एज्युकेशन सोसायटी 

“ या स्वायत्ततेमुळे फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅड रिसर्च च्या विद्यार्थ्यांसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि ते इंजिनिअरिंग स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होतील”

 – डॉ .संजय अदाटे , कॅम्पस डायरेक्टर , फॅबटेक एज्युकेशन सोसायटी


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button