
वाटंबरे/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यात (Sangola Accident) वाटंबरे येथील मान नदीजवळ भीषण अपघात घडला. भरधाव वेगात आलेली चारचाकी कार थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या एस.टी. बसला धडकली. (Sangola Accident) या दुर्घटनेत नाझरे येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एसटी बसचा चालक दुखापत झाली असून अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत.
ही एसटी (MH-20-BL-4226) तुळजापूर आगाराची असून कोल्हापूरकडे जात होती. (Sangola Accident) दरम्यान, नाझरेहून सांगोलाकडे जाणाऱ्या कारने अचानक डिव्हायडर तोडत समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेनंतर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. राष्ट्रीय महामार्ग पोलीस व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. (Sangola Accident)