महाराष्ट्रसांगोला

बिग ब्रेकिंग : सांगोला-मिरज रोडवर दुचाकी-डमडमचा भीषण अपघातात, आई-मुलगा गंभीर जखमी

डमडमने मागून येत समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली


सांगोला, महेश लांडगे : सांगोला शहरातील मिरज रोडवरील गौरी पेट्रोल पंपाजवळ दुपारी ३ च्या सुमारास  भीषण अपघात झाला. डमडमचा आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत आई-मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. 

मध्यधुंद चालकामुळे अपघात

नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, डमडम (गाडी नं. MH13 AN 2297) चा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने मागून येत समोरील दुचाकीला (गाडी नं. MH13 BE 8775) जोरदार धडक दिली. मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.   

जखमींवर उपचार सुरू, चालकाला ताब्यात घेतले

अपघातानंतर जखमी आई आणि मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

वाहतूक कोंडी, नागरिकांनी मदत केली

अपघातानंतर मिरज-पंढरपूर रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र, स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास सांगोला पोलिस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button