देश- विदेशसांगोला

उदनवाडीत चोरीच्या तयारीत असलेले दोन चोरटे अटकेत; हत्यारे आणि दुचाकी जप्त


सांगोला / प्रतिनिधी : उदनवाडी ता. सांगोला येथे चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन चोरट्यांना स्थानिक नागरिकांनी पकडले. ही घटना  रात्री १.१५ वाजण्याच्या सुमारास हजारे वस्ती, उखळाचे माळ येथे घडली. पकडलेल्या चोरट्यांकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस नाईक सुजित जाधव यांनी फिर्याद दिली असून, अझरुद्दीन युनुस इस्लामपुरे (२८, रा. रमामाता नगर, सांगली) आणि गणेश शिवाजी वलेकर (२१, रा. उदनवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यासोबत असलेले इंद्रजित सरगर, माणिक शेंडगे बोले आणि एक अनोळखी इसम हे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

पहाटे ३ वाजता उदनवाडीचे पोलिस पाटील यांनी सांगोला पोलिसांना माहिती दिली की, गावातील लोकांनी दोन संशयित इसमांना पकडले आहे. तात्काळ पो.ना. सुजित जाधव, चालक पो.कॉ. आडके आणि पोलिस पाटील घटनास्थळी दाखल झाले. तेथे लोकांनी दोन इसमांना झुडपांच्या आड लपून बसताना पकडले होते.

स्थानीक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरटे दोन दुचाकींवरून आले होते आणि गावातील इंद्रजित हजारे यांच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने झुडपामागे लपले होते. तीन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले.

जप्त केलेले साहित्य:

पंचनामा करून दोघा चोरट्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्याकडून:

  • एक लोखंडी रॉड
  • एक धारदार चाकू
  • दोन लाल चटणीच्या पुड्या
  • एक युनिकॉर्न मोटारसायकल
  • एक नंबर नसलेली स्कूटी

या वस्तू हस्तगत करण्यात आल्या.

पोलिसांचा तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी चोरी करण्याच्या हेतूनेच गावात येणे कबूल केले आहे. फरार तीन चोरट्यांचा शोध सुरू असून सांगोला पोलीस अधिक तपास करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button