विशेष प्रतिनिधी: हातकणंगले तालुक्यातील संभापूर येथे एकाच कुटुंबातील दोन लहान भावंडांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोवार कुटुंबातील वरद सागर पोवार वय ६ आणि विराज सागर पोवार वय ४ या दोन चिमुकल्यांचा पोटदुखी व उलटीच्या त्रासानंतर मृत्यू झाला.
दोन्ही मुलांना पोटदुखी व उलटीचा त्रास सुरू झाल्याने पेठ वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी विराज याची प्रकृती खालावत गेली आणि रात्री त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, दुसरा मुलगा वरद यालाही त्रास सुरू झाल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची झुंज शुक्रवारी सकाळी संपली. दोन भावंडांचा अशा प्रकारे काही तासांत मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या आईला मानसिक धक्का बसल्याने त्यांना ही कोल्हापूरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांना या घटनेचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोन्ही मुलांचे अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात पार पडले. गावकऱ्यांनी कुटुंबाला मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला असून, अधिकृत तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
LIVE अपडेट्ससाठी आम्हाला “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” फॉलो करा
राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी “In Public News; आवाज सर्वसामान्यांचा” जनतेसमोर सत्य आणि Big Breakingअपडेट्साठी फॉलो करा!
लगेचsssMissCall करा आणि Join व्हा!
फोन : 820 883 2983
