देश- विदेशसांगोला

लग्नाच्या पंगतीतून उडाला गोंधळ; काटी-रॉडचा वापर करून तुंबळ हाणामारी


सांगोला : सांगोला तालुक्यातील लग्नसोहळ्यात जेवण वाढताना झालेल्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनाही मारहाण करण्यात आली.

ही घटना जवळा येथील अहिल्या चौकात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा भाऊ लग्न समारंभासाठी दुचाकीवरून जात असताना, काही व्यक्तींनी त्यांना अडवून “लग्नात शिवीगाळ का केली?” असा सवाल करत मारहाण केली. लाथाबुक्क्यांसह चाकू, काठी, लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला.

जखमींवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Rohit Hegade

"In Public News" हे एक डिजिटल मराठी न्यूज पोर्टल आहे. या पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या व लेखांमधील विचार हे संबंधित लेखकांचे वैयक्तिक मत असेलच असे नाही. "In Public News"ची टीम, संपादक किंवा संपादक मंडळ नेहमीच सहमत असतीलच असे नाही. जर एखाद्या लेखातील किंवा बातमीतून मांडलेल्या मतांशी आपण असहमत असाल, तर कृपया आपली प्रतिक्रिया लेखी (टेक्स्ट स्वरूपात) पाठवा. योग्य आणि सुयोग्य प्रतिसादांना प्रसिद्धी दिली जाईल. - संपादक: रोहित हेगडे, फोन: 9730 57 6560

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button