महाराष्ट्रदेश- विदेशशैक्षणिकसांगोला

सांगोला महाविद्यालयामध्ये एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन


सांगोला/स्वप्नील ससाणे :   सांगोला महाविद्यालयामध्ये दि. ५ व ६ एप्रिल २०२५ रोजी  २१वी  महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा सेवा निवृत्त सनदी अधिकारी डॉ.दि.मा. मोरे या परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव (भाऊ) गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सिंचन सहयोग ही छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय संस्था आहे. या संस्थेच्यावतीने पाणी आणि सिंचन या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. या संस्थेने यापूर्वी राज्यातील ग्रामीण भागात वीस पाणी परिषदा घेऊन हजारो तज्ज्ञ मार्गदर्शकांना व जलचिंतकांना एका मंचावर आणले, त्याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला. एकविसावी महाराष्ट्र सिंचन परिषेद सांगोल्यामध्ये होत आहे. हवामानातील दोलाईमानता आणि सिंचन व्यवस्थापन हा या परिषदेचा मुख्य विषय आहे, त्याचबरोबर  आधुनिक सिंचन प्रणाली, सिंचनाच्या भावीदिशा, सिंचित शेतीतील प्रयोग, फळबाग शेती या विषयावर मार्गदर्शन  व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव या परिषदेमध्ये शेतकऱ्यांना ऐकायला मिळणार आहेत.

अर्रर्र..”हे” तर रोजच आहे, विद्यार्थी म्हणतात…,न्यू इंग्लिश स्कूल,ज्यू.कॉलेज येथील शिक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी

राज्यस्तरीय सिंचन परिषद :

या राज्यस्तरीय सिंचन परिषदेच्या आयोजनाबाबतची बैठक यथील सांगोला महाविद्यालयामध्ये पार पडली. महाराष्ट्र सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे, परिषदेचे स्वागताध्यक्ष बाबुराव (भाऊ) गायकवाड यांनी परिषदेच्या नियोजन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक प्रफुल्लचंद्र झपके, महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे कार्यकारणी सदस्य सुधाकर चौधरी, महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे समन्वयक प्रशांत आडे, महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, वसुंधरा विकास संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शेलार, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. आपासाहेब पुजारी, सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव अॅड. उदय(बापू) घोंगडे सहसचिव साहेबराव ढेकळे, माजी सचिव म.सि. झिरपे, निमंत्रीत कार्यकारिणी सदस्य सुरेश फुले, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, प्रतिष्ठीत नागरिक, प्रगतशील शेतकरी ,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी या परिषदेच्या बैठकीस उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button